माणगाव - ‘उद्योगांना सकारात्मक वातावरण निर्माण करताना कोणी दादागिरी करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. मग तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, उद्योजकांना त्रास दिल्यास आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिला.