Navneet Rana : खासदार राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana

Navneet Rana : खासदार राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईतील कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्यच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर नवनीत यांच्यासोबत त्यांच्या वडिलांच्या विरोधातही हे वॉरंट काढण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी एका बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केला होता. यासंदर्भात त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामध्ये मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने हे वॉरंट काढले आहे. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Non Bailable Arrest Warrant Against Mp Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..