काँग्रेसचे आमदार फुटले? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं! | Balasaheb Thorat News | Maharashtra Congress News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat News | Maharashtra Congress News

काँग्रेसचे आमदार फुटले? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं!

शिवसेना नेता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. मविआ सरकार बरखास्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. अशातच, शिंदेसोबत गुवाहाटी येथे असणारे बच्चू कडू यांनी कॉंग्रेसचे आमदारही आमच्यासोबत येणार आहेत. असा दावा केला होता. हा दावा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खोडून काढला आहे. (Balasaheb Thorat News)

बाळासाहेब थोरांतांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल असून ४४ आमदार आमच्यासोबत आहेत. कॉंग्रेसचा कोणताही आमदार फुटलेला नाही. यावेळी असे स्पष्ट थोरात यांनी केले.

माध्यमांशी संवाद साधताना, विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाची बैठक सुरु आहे. अशी माहिती थोरातांनी दिली. तसेच, आमचे ४४ आमदार आमच्यासोबत मुंबईत आहेत. ३ आमदार अजून दाखल व्हायचे आहेत. ते येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. कॉंग्रेसमध्ये कोणतीही अडजण नाही. असे स्पष्टीकरण थोरात यांनी यावेळी दिले.

गुवाहाटी येथे शिंदेंसोबत असणारे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे काही आमदार आमच्यासोबत येणार आहेत. असा दावा केला होता.

Web Title: Not A Single Congress Mla Has Split Balasaheb Thorat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top