विजेच्या मागणीचा ट्रेंड सकाळकडून संध्याकाळकडे 

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

मुंबई : राज्यात ऑक्‍टोबरमधील विजेची सर्वाधिक मागणी सकाळी होत होती. यंदा मात्र हा ट्रेंड बदलून संध्याकाळी मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

सायंकाळी विजेची मागणी वाढण्यामागे शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याचे वाढलेले तास कारणीभूत आहेत. शेतीपंपाला 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला 18,250 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या वेळी महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीज पुरवली होती. यंदा विजेची मागणी 20 ऑक्‍टोबरला सकाळच्या वेळेत 16,500 मेगावॉट इतकी होती; तर महावितरणने 17,300 मेगावॉट इतकी वीज दिली होती.

सायंकाळच्या वेळेत विजेच्या मागणीतील वाढ सरासरी 800 मेगावॉट इतकी नोंदवण्यात आली. महावितरणला शेतीपंपासाठी पुरवण्यात येणाऱ्या जादा विजेसाठी अर्थ विभागाकडून आर्थिक तरतूद होणे अपेक्षित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शेतीला जादा तास वीज पुरवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

राज्यात सध्या 39 लाख वीजपंप आहेत; त्यांना आठ तासांऐवजी 10 तास वीज पुरवण्यात येत आहे. शेतीसाठी एक हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवावी लागणार आहे. 

Web Title: Now demand for electricity is more in the night