श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन बुकिंगसाठी आता शंभर रुपये...

pandharpur
pandharpur

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी इतके दिवस शुल्क आकारणी केली जात नव्हती. आज (शनिवार) झालेल्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत ऑनलाइन दर्शनासाठी नाममात्र शंभर रुपये फी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी ही माहिती आज 'सकाळ'ला दिली. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मात्र असा निर्णय झालेला नसून याविषयी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंदिर समिती सदस्यांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार राम कदम, आमदार सुजित सिंह ठाकुर हे तीन सदस्य आज दिल्ली येथे गेलेले असल्याने पंढरपूर येथील बैठकीत उपस्थित नव्हते. डॉ. भोसले यांच्या परवानगीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज समितीची बैठक पार पडली.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनाचे बुकिंग करण्याची व्यवस्था मागील वर्षापासून सुरू केलेली आहे. मंदिरालगतच्या संत तुकाराम भवन मध्ये बुकिंग केल्याची प्रिंट दाखवल्यावर अशा भाविकांना तातडीने दर्शनास सोडण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे गडबडीने येणारे भाविक त्यांच्या गावाकडून निघतानाच मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन दर्शन बुकिंग करून येतात.

आज झालेल्या बैठकीत ऑनलाईन बुकींग व्यवस्थेचा फायदा इंटरनेट कॅफे व्यावसायिकांना होतो परंतु मंदिर समितीला मात्र एक रुपयाही मिळत नाही. नुकताच राज्य सरकारने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध मंजूर केला आहे. त्याचबरोबर मंदिरात अनेक सुधारणा करायच्या असल्यामुळे निधीची गरज लागणार आहे. पंढरपूर शहरातील समितीच्या ज्या 28 परिवार देवता आहेत तिथेही आवश्यक सुधारणा करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. मागील वर्षी तब्बल 13 लाखाहून अधिक भाविकांनी ऑनलाईन दर्शन व्यवस्थेचा फायदा घेऊन झटपट दर्शन मिळवले 100 रुपये शुल्क आकारणी केली असती तर या व्यवस्थेतून 13 कोटी रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळाले असते. सुधारणा कामांसाठी निधीची गरज लागणार असल्याने ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर आणि संभाजी शिंदे यांनी सकाळची बोलताना दिली.

दरम्यान आज दिल्ली येथे असलेल्या डॉ. भोसले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता 'सकाळ'शी बोलताना त्यांनी ऑनलाइन दर्शन बुकिंग साठी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आपल्या उपस्थितीत चर्चा केली जाईल. सर्व सदस्यांची मते विचारात घेतली जातील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे. एकंदरीतच या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भात मंदिर समितीमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नसल्याचे चित्र आज पुढे आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com