Maharashtra Cabinet: आता सरपंच, नगराध्यक्षांची होणार थेट जनतेतून निवड

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Eknath Shinde_Devendra Fadnvis
Eknath Shinde_Devendra Fadnvis

मुंबई : आरे कारशेडनंतर महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला आहे. त्यानुसार आता सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. (Now in Maharashtra Sarpanch and Nagradhyakhya will be elected directly by the people)

फडणवीस म्हणाले, देशात कोणतंही राज्य घ्या सर्वच राज्यात सरपंचाची थेट जनतेतून निवड होते, त्यामुळं तसेच महाराष्ट्र सरपंच परिषदेत राज्यातील ५० हजारांहून अधिक सरपंचांनी एकमुखानं सरपंचाची निवड थेट जनतेतून व्हावी असं म्हटलं आहे. त्यामुळं अनेक लोकप्रतिनिधींनी आणि देशात जो ट्रेंड आहे त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

थेट निवडीचा निर्णय का?

ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून कोणीही आलं तरी पैशाच्या जोरावर सरपंच किंवा नगराध्यक्षपदं मिळवली जातात. त्यामुळं जो लायक उमेदवार आहे त्याला बाजूला केलं जातं. यामुळं चांगल्या लोकांची संधी जाते, म्हणून थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com