esakal | आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बदलली TET ची तारीख; 'या' तारखेला होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बदलली TET ची तारीख

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. आरोग्य विभागीतल 'क' आणि 'ड' वर्गाच्या परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानकपणे रद्द करण्यात आल्या होत्या. या प्रकारच्या सावळ्या गोंधळावर विद्यार्थी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट 'ड'ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आता टीईटीच्या परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.

हेही वाचा: आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET; दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना मनस्ताप

शिक्षक पात्रता परीक्षा आधी 31 ऑक्टोबर रोजी होणार होती. ती तारीख बदलून आता 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला आरोग्य भरतीची परीक्षा होणार असल्याकारणाने आता ही परीक्षा आदल्या दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी अर्ज केला आहे.

नोकरीच्या शोधात असलेले अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट 'ड' परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची? आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का? असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत होते. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.

loading image
go to top