esakal | साठी ओलांडलेल्यांना मिळणार लस

बोलून बातमी शोधा

Now Vaccines will given to senior citizen above 60 year old in India}

 

को-कोव्ही (कोव्हिन व्हॅक्सिन इंटेलिजन्स वर्क) हे अॅप खास लसीकरणाच्या नावनोंदणीसाठी विकसित करण्यात आले आहे. यात नावनोंदणी झालेल्यांना लस देण्यात येते.

साठी ओलांडलेल्यांना मिळणार लस
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे :  वयाची साठी ओलांडलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. तसेच, इतर आजार असलेल्यांनाही ही लस देण्याची सुविधा सरकार उपलब्ध करत आहे. अर्थात, त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नावनोंदणी करावी लागेल.
आरोग्य सेवक आणि साथरोग उद्रेकात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पावले उचलण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या संसर्गापासून प्रतिबंध करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. याचा प्रत्येकी दोन डोस देण्यात येत आहेत. त्यानंतर आता लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कोणाला मिळणार लस?
- 60 आणि त्यापेक्षा जास्त वर्षे वयाच्या नागरिकांना
- वय वर्षे 45 ते 59 दरम्यानच्या इतर व्याधी असणाऱ्यांना

अशी करा नावनोंदणी
अद्ययावत केलेल्या को-व्हिन अॅपमध्ये नावनोंदणी करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी को-व्हीन 2.0 हे अद्ययावत अॅप येत्या सोमवारी (ता. 1) कार्यन्वित होईल. त्या अॅपमध्ये जाऊन नागरिकांना नावनोंदणी करावी लागेल.

दृष्टीक्षेपात देशातील लसीकरण
- नोंदणी झालेले आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर : एक कोटी 85 लाख
- लसीकरण झालेले कर्मचारी : 1.28 कोटी
असे झाले राज्यात लसीकरण
- राज्यात लस घेतलेल्यांची संख्या : 12 लाख एक हजार 96
- पहिला डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी : 6 लाख 61 हजार 200
- दुसरा डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी : एक लाख 58 हजार 681
- पहिला डोस घेतलेले फ्रंटलाइन वर्कर : 3 लाख 81 हजार 215

दोन दिवस लसीकरण बंद
को-कोव्ही (कोव्हिन व्हॅक्सिन इंटेलिजन्स वर्क) हे अॅप खास लसीकरणाच्या नावनोंदणीसाठी विकसित करण्यात आले आहे. यात नावनोंदणी झालेल्यांना लस देण्यात येते. याच आधारावर आतापर्यंत लस देण्यात आली आहे. हे अॅप अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारचे लसीकरण बंद राहील. तसेच, रविवारी सुटीमुळे लसीकरण होणार नाही. ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्यांच्या नावनोंदणीसाठी हे अॅप अपडेट करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

''अद्ययावत अॅप कार्यान्वित झाल्यानंतर त्या बद्दलचे प्रशिक्षण जिल्हा पातळीवर आणि त्यानंतर खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना दिले जाईल. त्यानंतर लसीकरण केंद्र निश्चित केली जातील. तसेच, नावनोंदणी केलेल्यांनाच फक्त लस मिळणार आहे.''
-डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग