NSEच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना EDकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Ramkrushna

NSEच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना EDकडून अटक

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली आहे. त्या मुख्य नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांना ४ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. याअगोदर त्यांना ‘एनएसई’तील को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.

(Chitra Ramkrushna Arrested By ED)

चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रह्मण्यम यांची मुख्य सल्लागार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. ही नेमणूक बेकायदा असल्याचा आरोप चित्रा यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Web Title: Nse Former Ceo And Md Chitra Ramkrushna Arrested By Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeStock MarketNSE