
गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर ठीकठिकाणी मोर्चे निघताना पाहायला मिळत आहेत.
काल परभणी येथे झालेल्या मोर्चा मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलेली पाहायला मिळत आहे.आत्ता यावर ओबीसी नेते हे आक्रमक झाले असून अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे.