esakal | परप्रांतिय ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीचे वडेट्टीवारांकडून स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Vijay Wadettiwar

परप्रांतिय ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीचे वडेट्टीवारांकडून स्वागत

sakal_logo
By
Team eSakal

परप्रांतिय ओबीसींचीही राज्यात ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. या मागणीचे कॅबिनेट मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही स्वागत केले आहे. परप्रांतीय ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) देण्याचा प्रस्ताव तयार करणार असून तो केंद्राकडे पाठवण्यात येईल असं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. ठाकरे सरकार परप्रांतियांना ओबीसी आरक्षण देणार का असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसने त्यांची सत्ता असताना केलं नाही, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे राजकारण करण्यासाठी आता हे केलं जात आहे अशा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

मध्य प्रदेशासह उत्तर भारतातून वेगवेगळे लोक राज्यात राहत आहेत. त्यांना राज्याच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. उत्तर भारतातून पिढ्यानपिढ्या राहणारे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्रात राहतात म्हणून त्यांच्या राज्यात लाभ मिळत नाही. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. याबाबत वडेट्टीवारांशी चर्चा झाली आणि समाजाची भावना आहे की, केंद्राच्या योजनेचा लाभ मिळतो पण राज्याच्या योजनांमध्ये लाभ मिळत नाही, त्यामुळे आरक्षणाची मागणी केली असे नसीम खान यांनी म्हटलं.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणासंदर्भात आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक;पाहा व्हिडिओ

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची मागणी केली आहे. हे फक्त राजकारण आहे असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तर यातून काही साध्य होणार नाही, महाराष्ट्रातील लोकांना असं उत्तर प्रदेशात काही आरक्षण मिळत नाही. परप्रांतियांना आरक्षण अशक्य, अशी मागणी करणारे आणि त्यावर प्रस्ताव देणारे मूर्ख असल्याचं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून सरकारवर टीका केली.

loading image
go to top