
वर्धा : शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० क्षमतेची दोन वसतिगृहे मंजूर केली आहेत. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांसाठी बाहेरगावी शिक्षण घेण्याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० विद्यार्थ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी ६० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. संपूर्ण राज्यात २१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र, सध्या या योजनेचा विसर शासनाला पडला असून कुठलाही निधी या विद्यार्थ्यांना मिळाला नाही.