esakal | असे घ्या विठ्ठल- रुक्‍मीणीचे ऑनलाइन दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

On the occasion of Ashadi Ekadashi Vitthal Rukmini can be seen online from home

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी सध्या बंद असले तरी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या http://www.vitthalrukminimandir.org/onlineDarshan.html या संकेतस्थळावर तसेच 

असे घ्या विठ्ठल- रुक्‍मीणीचे ऑनलाइन दर्शन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी सध्या बंद असले तरी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या http://www.vitthalrukminimandir.org/onlineDarshan.html या संकेतस्थळावर तसेच 
खासगी कंपनीच्या सेवेद्वारे श्रींचे लाईव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 
जोशी म्हणाले, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. 
खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूरच्या http://www.vitthalrukminimandir.org/onlineDarshan.html या संकेत स्थळावर तसेच 
खासगी कंपनीच्या सेवेद्वारे डिशवर श्री लाईव दर्शन 24 तास उपलब्ध आहे. तसेच "श्री. विठ्ठल रूक्‍मिणी देवस्थान' या मोबाईल अँपलिकेशनवर देखील उपलब्ध आहे. सदरचे मोबाईल ऍप गुगल अपस्टोअरवर "श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थान' या नावाने मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांना जरी श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे 
पदस्पर्श दर्शन बंद असले तरी वरील संकेतस्थळावरून तसेच डिश आणि मोबाईल अपद्वारे घरबसल्या श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.