
चिमूर (चंद्रपूर) : चिमूर येथील एका तरुणाकडून इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. ज्यामुळे शहरातील शेकडो शिवभक्त आक्रमक होऊन त्या तरुणास अटकेच्या मागणी करीता शुक्रवारी रात्री १० .३० च्या सुमारास पोलिस स्टेशनला घेराव घालण्यात आला. ज्यामुळे वाढलेल्या तणावाने दंगल नियंत्रण पथक व अतिरिक्त पोलिस कुमक बोलवण्यात आली. टिप्पणी करणाऱ्या युवकास मध्यरात्री अटक करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.