
Government Employee: महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनने पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना (OPS) परत आणण्याचे रणशिंग फुंकले आहे. फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, ओपीएस पुन्हा लागू करणे, ही आमची मूळ मागणी आहे. येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल. यानंतर, जुन्या पेन्शन योजनेबद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हे आंदोलन पाहता कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन पुन्हा मिळेल का, असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.