
महेश जगताप, मुंबई: राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता वाटपही पार पडले आहे. मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर मंत्री कार्यालयात वर्णी लावण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची झुंबड उडाली आहे. मात्र आधीच्या सरकारमधील असलेल्या मंत्र्यांच्या जुन्या स्विय सहाय्यकांनी मलईदार खाते मंत्री महोदयांना पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकाळात न मिळाल्याने पळ काढला आहे.