नव्या व्हेरीयंटची भीती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक|Omicron Corona Variant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

नव्या व्हेरीयंटची भीती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरीयंट (Corona New Variant) आढळला असून हा व्हेरीयंट धोकादायक असल्याचे सांगितलं जात आहे. या विषाणूला ओमीक्रोन (Omicron Corona Variant) हे नाव देण्यात आले आहे. तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे धोका वाढला असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Maharashtra CM Uddhav Thacekray) बैठक बोलावली आहे.

हेही वाचा: Omicron : पाकिस्तानसह ७ देशांची दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर बंदी

मुख्यमंत्री ठाकरेंच्या बैठकीत आज सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यात येणार आहे. सध्या राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात असून लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा नवीन प्रकार वेगाने फैलावणारा व चिंताजनक प्रकार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तसेच या विषाणूमुळे सर्वच देशांची झोप उडाली असून पाकिस्तानसही सात देशांनी दक्षिण आफ्रिकेत प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.