Wardha : ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला चिरडत ट्रक चढला दुभाजकावर; पोलिसाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wardha Accident
Wardha : ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला चिरडत ट्रक चढला दुभाजकावर; पोलिसाचा मृत्यू

Wardha : ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला चिरडत ट्रक चढला दुभाजकावर; पोलिसाचा मृत्यू

वर्ध्यामध्ये एका ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ध्यातल्या खंडाळामध्ये ही घटना घडली. ट्रकने दिलेल्या जबर धडकेत या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वरच्या खंडाळा शिवारात महामार्ग पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी उभ्या असलेल्या एका गाडीला ट्रकने मागून धडक दिली आणि हा ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला. आणि पुढे जात दुभाजकावर चढला.

या दुर्घटनेत गौरव खरवडे यांचा मृ्त्यू झाला आहे. त्यांना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी ट्रक चालक सुनील ढोणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवडे आपल्या दहा सहकाऱ्यांसह महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांचा अपघात झाला.