Nana Patole : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचा 'प्लॅन रेडी'; राहुल गांधी महाराष्ट्रात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul gandhi, nana Patole

Nana Patole : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचा 'प्लॅन रेडी'; राहुल गांधी महाराष्ट्रात...

मुंबई - देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यापासून काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली. शिवाय अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात दाखल होणार आहे. मात्र या यात्रेतून काँग्रेसला फायदा होणार का, या चर्चा सुरू झाल्या असतानाच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या भविष्यातील प्लॅनविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. (Nana Patole news in Marathi)

हेही वाचा: "काळ्या टोपीखाली सडका मेंदू" राष्ट्रवादीच्या आमदाराची राज्यपाल कोश्यारींवर जहरी टीका

काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली. ही यात्रा आणखी बरेच दिवस चालणार आहे. यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मात्र या यात्रेतून काँग्रेसला खरच फायदा होणार का, असे प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र आता नाना पाटोले यांनी काँग्रेसच्या पुढील प्लॅनबाबत मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आम्ही राज्यातील सर्व 6 आयुक्तालयांच्या ठिकाणी रॅली काढणार आहेत. या रॅलींमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.

एकंदरीतच काँग्रेस आगामी काळात उसंत घेणार नसून आक्रमक पावित्रा घेणार हे स्पष्ट आहे. शिवाय २०२४ च्या निवडणुकीला आता जेमतेम दीड वर्ष शिल्लक आहे. तसेच राज्यातील विधानसभेची मुदत देखील २०२४ मध्येच संपणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा आगामी काळातील प्लॅन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.