काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये : चंद्रकांत पाटील

वृत्तसंस्था
Thursday, 18 July 2019

- जागावाटपचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरु असताना आता नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नाही, असे विधान त्यांनी केले. तसेच काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असेही ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की ''भाजप आणि शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. जागावाटप करताना यापूर्वीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपले एकमेव लक्ष्य असून, काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत केलेले हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One of the five Working President will enter in BJP soon says Chandrakant Patil