अविनाश साबापुरे
यवतमाळ - आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत. नव्या शिक्षण धोरणातील आकृतिबंधानुसार 3 ते 6 वर्षे वयोगातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत.