esakal | राज्यातील १५०० माजी आमदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना रुग्णांसाठी

बोलून बातमी शोधा

null
राज्यातील १५०० माजी आमदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना रुग्णांसाठी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यावर कोसळलेल्या संकटात माजी आमदारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील १५०० च्यावर माजी आमदार कोरोना रुग्णांच्या लढण्यासाठी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. One month's salary of 1500 former MLAs in the state for corona patients

महाराष्ट्र राज्य माजी समन्वय समितीने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ व इतर उपाययोजनांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी राज्यातील १५०० च्यावर माजी आमदारांच्या एक महिन्याच्या मानधनातून कपात करून घेण्याची विनंती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवार, ता. ३ मे रोजी पाठवलेल्या पत्रातून केली आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीने राज्य सरकारला एक महिन्याचे माधन देवून आर्थिक मदत दिली होती.

साडेसात कोटीवर निधी

राज्यातील माजी आमदारांची संख्या व त्यांना मिळणारे एक महिन्याचे मानधन लक्षात घेता साधारण ७.५ कोटीच्या वर निधी कोरोना रुग्णांच्या उपाचारासाठी उभा होणार आहे.

राज्यात १५०० माजी आमदार असून, त्यांना दरमहा मिळत असलेल्या मानधनातून एक महिन्याचे मानधन कपात करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांन विनंती केली आहे. कोरोना संकटात आम्ही राज्यातील जनता व सरकारसोबत आहोत.

- माजी आमदार सुधाकरराव गणगणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वयक समिती