सोलापूर : राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना दोन वर्षातच गुंडाळली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरिपात पीकविमा भरण्यासाठी सोयाबीनसाठी दोन टक्क्याप्रमाणे प्रतिहेक्टरी एक हजार रुपये, कांद्यासाठी पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार आणि कापसाला प्रतिहेक्टरी अडीच हजार रुपयांचा प्रीमिअम भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.