
मुंबई : ONGC हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅँडिंग, चौघांचा मृत्यू
मुंबई : ओएनजीसीच्या (ONGC) हेलिकॉप्टरला काही वेळापूर्वी अरबी समुद्रात तेल रिगजवळ आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या हेलिकॉप्टर अपघातात ९ जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून ५ जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. ओएनजीसीच्या मालवीय-16 या जहाजातून चार आणि ओएनजीसीच्या रिग सागर किरणच्या रेस्क्यू बोटमधून पाच जणांची सुटका करण्यात आली. ओएनजीसी हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने सीकिंग आणि एएलएच हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदल जहाज तेग तैनात केले होते. (ONGC Helicopter Emergency Landing )
हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसीचे सहा कर्मचारी आणि कंपनीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराचा एक कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ONGC कडे अरबी समुद्रात अनेक रिग आहेत ज्यांचा वापर समुद्रतळाच्या खाली असलेल्या जलाशयांमधून तेल आणि वायू तयार करण्यासाठी केला जातो.
Web Title: Ongc Helicopter Makes Emergency Landing 4 People Rescued So Far
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..