Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका

Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका

Onion: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास एक हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने भिजला. पूर्व अनुभव असतानाही बाजार समितीने यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दिवस रात्र करून विक्रीस आणलेला कांदा भिजल्यामुळे मातीमोल भावाने विकावा लागला.

प्राथमिक अंदाजानुसार १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा भिजला असल्याची माहिती समोर येत आहे. कांदा भिजल्यामुळे या कांद्याची विक्री अत्यंत कमी दरात झाली. वास्तविक पाहता बाजार समितीत आलेल्या शेतीमालाला योग्य जागा व निवारा देण्याची प्राथमिक जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे.

Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका
Onion Rate Hike: लासलगावमध्ये लाल कांदा भावात 1600 रुपयांची वाढ

मात्र, बाजार समितीने याबाबतीत कुठलीच ठोस उपाययोजना केली नाही. रात्री दहा वाजता सुरू झालेल्या या पावसाकडे हताशपणे पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नव्हता. बुधवारी झालेल्या लिलावात या कांद्याला निम्म्यापेक्षाही कमी दर मिळाला.

बाजार समिती बोध घेणार केव्हा?

यापूर्वी २०१७ डिसेंबर व २०१८ जानेवारी या महिन्यात अवकाळी पावसाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणात कांदा भिजला होता. मात्र यानंतरही बाजार समितीने अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलीच ठोस उपाययोजना केली नाही.

Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका
Onion News: तर कांदा आयात करावा लागू शकतो ; व्यापाऱ्यांनी वर्तवली भीती

कांद्याला अपुरा निवारा असल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्त्यावरच कांदा उतरावा लागतो. मंगळवारी विक्रीसाठी नेलेला कांदा अवकाळी पावसाने भिजला, प्रतिक्विंटल अवघा हजार रुपये विकला. शेतकरी स्वतःच्या शेतात पिक वाचवण्यासाठी उपाययोजना करतो ,मात्र बाजारात हतबल असतो.

शाहरुख पटेल, शेतकरी, हिरज

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर गूळ विभागातील तीन गोडाऊन कांदा साठवणुकीसाठी खुले ठेवले होते, मात्र कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कांदा भिजला, भविष्यात याबाबत काळजी घेऊ.

श्रीशैल नरोळे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका
Onion News: मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत भाजपने वाटले कांदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com