Onion Prices, solapur APMC
तात्या लांडगे
सोलापूर : येथील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १५ व १६ डिसेंबरला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. त्यावेळी सरासरी भाव सतराशेपर्यंत होता. मात्र, आता मागील तीन दिवसांत कांद्याची आवक वाढल्याने भावात २५० ते ३०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
१५ डिसेंबरला सोलापूर बाजार समितीत २२१ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. त्यावेळी सरासरी भाव प्रतिक्विंटल १६०० रुपयांचा तर कमाल दर ३५०० रुपये मिळाला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला २६१ गाड्या कांदा आला होता. त्यावेळी सरासरी भाव १७०० रुपये तर कमाल भाव ३५०० रुपयांपर्यंत मिळाला होता.
या हंगामातील हा उच्चांकी दर ठरला. पण, सप्टेंबरमध्ये लागवड झालेला कांदा सध्या बाजारात येत आहे. सध्या सोलापूरसह बीड, सांगली, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव आणि कर्नाटक, विजयपूर येथूनही कांदा सोलापूर बाजार समितीत येत आहे. भावात सुधारणा झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे भावात घसरण झाल्याचे चित्र आहे.
तीन दिवसांतील आवक अन् भाव
वार आवक सरासरी कमाल भाव
गुरुवार ४४६ १३०० ३१००
शनिवार ४६१ १३०० ३३००
सोमवार ३३८ १२५० ३३००
मार्चपर्यंत भावात राहणार तेजी, पण...
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बंगळूर येथील बाजारात कांदा विक्रीसाठी नेत आहेत. त्याठिकाणी ३५०० ते ३९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत देखील सरासरी दोन हजार ते तीन हजारांपर्यंत भाव आहे. तीन ते साडेतीन हजारांपर्यंतचा भाव मार्चपर्यंत स्थिर राहील, असे व्यापारी सांगत आहेत. दक्षिण भारतात, बांगलादेश, श्रीलंकेत कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्धवट वाळलेला, कच्चा कांदा विक्रीसाठी आणू नये. वाळलेला व पूर्ण वाढ झालेला कांदा आणावा, जेणेकरून चांगला दर मिळेल, असे आवाहन बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.