
सोलापूर : अतिवृष्टीमुळे खरीप आणि लेट खरीपात कांद्याचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढली आहे. तत्पूर्वी, गतवर्षी प्रतिक्विंटल कांद्याला पाच हजार 849 रुपयांचा मिळाला. यंदा मात्र, सरासरी प्रतिक्विंटल दोन हजार 593 रुपयांचाच दर मिळत असून आज (ता. 24) मुंबईत सव्वीश, लासलगावात दोन हजार 412 रुपये तर पुण्यात चोवीसशे आणि सोलापुरात तीन हजार 600 पर्यंतचा सर्वाधिक दर होता. आगामी काळात आवक वाढणार असल्याने दर आणखी कमी होतील आणि शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागेल. या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात सुरु करावी, असे पत्र कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठविले आहे.
निर्यात सुरु करण्यासंदर्भात केंद्राला पत्र
राज्यभरात आतापर्यंत चार लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. खरीप, लेट खरीपचा कांदा खराब झाल्याने उन्हाळी कांद्याची लागवड वाढत आहे. आता आवक वाढल्याने दर आणखी कमी होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या हितासाठी निर्यात सुरु करावी, असे पत्र केंद्र सरकारला कृषी विभागाच्या माध्यमातून नुकतेच पाठविले आहे.
- सुनिल पवार, कार्यकारी संचालक, पणन
लॉकडाउनमध्ये अडकलेल्या बळीराजाने खरीप हंगामात लागवड केलेल्या 82 हजार 742 हेक्टरपैकी 48 हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. लेट खरीपातील दोन लाख 13 हजार हेक्टरपैकी 12 हजार हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे आता रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागली असल्याने कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळातच शेतकऱ्यांना कांद्याचे दर चांगले मिळतात. मात्र, यंदा आवक वाढल्याने आणि निर्यात बंदी असल्याने शेतकऱ्यांना चांगला, दर्जेदार कांदा कमी दराने विकावा लागत आहे. गतवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 56 लाख 28 हजार मे.टन कांदा आवक झाला होता. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या काळात अंदाजित 40 लाख मे.टनापर्यंत कांदा बाजारात येऊ शकतो. त्यामुळे निर्यात सुरु करावी, अन्यथा लागवडीच्या खर्चाएवढाही दर शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेही राज्य सरकारने केंद्राला कळविले आहे.
जानेवारीपर्यंतची तुलनात्मक स्थिती...
यंदाची आतापर्यंतची कांदा लागवड
3,99,740 हेक्टर
गतवर्षीची जानेवारीअखेर कांदा लागवड
6,17,854 हेक्टर
यंदा डिसेंबरमधील कांदा आवक
2,36,372 मे.टन
गतवर्षीची डिसेंबरअखेरची आवक
4,09,283 मे.टन
डिसेंबरमधील मागील वर्षीचे दर
5,849
यावर्षीचा 23 डिसेंबरपर्यंतचा दर
2,593
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.