Conversion Case: धक्कादायक! मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर? राज्यात खळबळ

ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट
Conversion Case
Conversion Case

सध्या देशभरात ऑनलाईन धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्रा येथे सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती गाझियाबादच्या पोलीस आयुक्तां दिली आहे. (online game conversion case 400 people converted in mumbra area)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईजवळील मुंब्रा भागात 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. (Latest Marathi News)

400 जणांचं धर्मांतर...

गाझियाबादचे पोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांनी या माहितीची पुष्टी केली आहे. गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. तपास सुरु असल्याची माहितीदेखील अधिकाऱ्याने दिली.

Conversion Case
Gaming Scam : मोबाईलच्या गेमिंगमध्ये रंगतोय धर्मांतराचा खेळ, आता नवी 'द गाझियाबाद स्टोरी'

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन

हिंदू धर्मीय मुलांना ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबियांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाजियाबाद पोलिसांना मिळाली. (Marathi Tajya Batmya)

Conversion Case
Crime News: मुंबईत थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये...

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले. या प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांनी गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. (Marathi Tajya Batmya)

कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातूनतो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com