
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (18 जुलै 2025) विधानसभेत या विषयावर महत्त्वाचे विधान केले.