.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही विरोधकांनी भाजपला घेरत पंतप्रधान भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. पुतळ्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत विरोधकांनी ‘चुकीला माफी नसल्याचे’ सांगत सरकार दरबारी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविषयी सरकारला जाब विचारला आहे.