esakal | 'मुंबईत दहशतवादी पकडणे गंभीर, अशा लोकांना संपवलंच पाहिजे'
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

'मुंबईत दहशतवादी पकडणे गंभीर, अशा लोकांना संपवलंच पाहिजे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : दिल्ली पोलिसांनी घातपाताच्या संशयावरून दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये मुंबईतील (mumbai terrorism) एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यावरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: दहशतवादी प्रकरणामुळे गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक;पाहा व्हिडिओ

देशात आणि मुंबईसारख्या ठिकाणी दहशतवाद्याला पकडणे ही खूप गंभीर बाब आहे. लपून बसलेल्या लोकांना शोधले पाहिजे. अशा घटना पुन्हा होणार नाहीत याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना संपवलं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांपैकी एक जान मोहम्मद असून तो मुंबईतील धारावीचा आहे. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे मुंबईत घातपाताची शक्यता होती का? अशी भीतीही व्यक्त केली जात होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि संबंधितांशी बैठक घेतली. त्यामध्ये नेमकं प्रकरण काय आहे याबाबत सर्व माहिती घेतली.

दरम्यान, एटीएसने पत्रकार परिषद घेऊन या सर्व बाबीची माहिती दिली. दाऊदशी २० वर्षांपासूनचे संबंध असल्याची माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे. त्याच्यावर एटीएसची बारीक नजर होती. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तो धारावीच्या झोपडपट्टीत राहायचा. 13 तारखेला तो दिल्लीला जाणार होता. तिकीट उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेमधून तत्काळने जाण्याचं नियोजन केलं. आरोपी गोल्डन टेम्पल ट्रेनने दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मद अली महम्मद शेखला रेल्वे राजस्थानमधील कोट्यामध्ये अटक करण्यात आली आहे, असेही एटीएसने सांगितले आहे.

loading image
go to top