विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दावा करणार नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र ताकद दाखवली जाणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची अट नसल्याचे विधिमंडळ सचिवालयाने लेखी स्पष्ट केल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा भक्कम झाला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेला विरोधी पक्षनेता मान्य असल्याचे आज आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत सहमतीने ठरवण्यात आले असले तरी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडीही करण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधी पक्षाच्या संख्याबळानुसार आघाडीत सर्वाधिक २० आमदार ठाकरेंच्या पक्षाचे असल्याने त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांकडून सहमती दर्शविण्यात आली आहे. मात्र संख्याबळानुसार विधान परिषदेसाठी काँग्रेसचा आग्रह आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कालावधी ऑगस्टमध्ये संपल्यानंतर त्यावर काँग्रेसकडून दावा केला जाईल.
विरोधी पक्षनेतेपदासाठी अट नाही!
दरम्यान, ठाकरेंच्या पक्षाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे यासंदर्भात नियमांची मागणी केली होती. त्यावर सचिवालयाने उत्तर दिले असून अशी कोणतीही अट नसल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात विधानसभा नियमात कोणतीही तरतूद नाही.
प्रचलित संसदीय प्रथा व परंपरा यांच्या सांगोपांग विचार करून विधानसभा अध्यक्ष हे आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता यांच्या नियुक्तीसंदर्भात निर्णय घेत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.