महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी असू शकतात 'हे' पर्याय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राज्यातील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यांना आज (मंगळवार) रात्री साडेआठपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांना आवश्‍यक ते संख्याबळ गोळा करावे लागणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या मुदतीत भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक संख्याबळ गोळा करता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सोमवारी (ता. 11) रात्री राज्यातील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यांना आज (मंगळवार) रात्री साडेआठपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांना आवश्‍यक ते संख्याबळ गोळा करावे लागणार आहे. राज्यातील जनतेचे याकडे लक्ष लागले आहे.

पर्याय 1

 • राष्ट्रवादीला आज रात्री 8.30 पर्यंत संख्याबळ सादर करण्याचे आदेश.
 • आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकते.
 • शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय संख्याबळ गाठणे राष्ट्रवादीला शक्य नाही.
 • शिवसेना मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकते. पण, राष्ट्रवादीने ते मान्य करायला हवे.

पर्याय 2

 • राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकले नाही तर राज्यपाल काँग्रेसला निमंत्रित करू शकतात.
 • राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसलाही शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय काहीही करणे अशक्य.
 • काँग्रेस विचारसरणीनुसार काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही.

पर्याय 3

 • काँग्रेस व राष्ट्रवादी सत्ता स्थापनेस नकार देतील.
 • राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करतील.
 • पण, काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा मागितल्यास उद्धव ठाकरे पाठिंबा देऊ शकतील.

पर्याय 4

 • पूर्ण संख्याबळाशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार नाही. त्यानुसार भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिला आहे.
 • भाजप दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्याने सत्तेत येऊ शकते. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास असे होऊ शकते.

पर्याय 5

 • राष्ट्रपती राजवटीनंतरही कुठलाही पक्ष सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल पुन्हा निवडणुका जाहीर करू शकतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: options of government formation in maharashtra