esakal | अरेच्चा ! 'या' महापालिकेच्या आयुक्‍तांनी काढला न्यायालय बंदचा आदेश अन्‌ मग पुढे झाले असं... 
sakal

बोलून बातमी शोधा

solapur mahapalika


'या' सेवा पूर्णपणे बंदच राहतील 

 • किरणा दुकाने, किरकोळ, ठोक व्रिक्रेते अन्‌ व्यापारी दुकाने 
 • क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उपहारगृहे, लॉज, हॉटेल, ऑर्केस्ट्रा बार, मॉल, बाजार समिती 
 • केश कर्तनालय, सलून, ब्यूटी पार्लर, आडत, आठवडा बाजार 
 • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी; मटन, चिकन, अंडी व मासे विक्री दुकाने 
 • मालवाहतूक, सार्वजनिक व खासगी वाहतूक, बांधकाम, खासगी कार्यालये 
 • चित्रपटगृहे, व्यायामशाहा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, मंगल कार्यालये, मॉल, लग्न समारंभ 
 • धार्मिक, राजकीय, सामाजिक, मनोरंजन कार्यक्रम; शासकीय स्वस्त धान्य दुकाने 
 • कृषी, बी-बियाणे, खते-किटकनाशके, चारा दुकाने वाहतूक बंद 

अरेच्चा ! 'या' महापालिकेच्या आयुक्‍तांनी काढला न्यायालय बंदचा आदेश अन्‌ मग पुढे झाले असं... 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने 16 ते 26 जुलै या काळात कडक संचारबंदीचा निर्णय झाला. याबाबत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी (ता. 14) रात्री उशीरा आदेश काढला. मात्र, घाईगडबडीत काढलेल्या आदेशात चक्‍क न्यायालय बंद राहतील, असे नमूद केले. तो अधिकार नसतानाही महापालिका आयुक्‍तांनी शहराच्या आदेशातील 17 क्रमांकावर तसे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाचे शुध्दीपत्रक काढून त्यात दुरुस्ती करण्यासंबंधी महापालिका आयुक्‍तांना सांगितले. त्यामुळे कडक संचारबंदी काळातही न्यायालयाचे कामकाज सुरुच राहील, असे ऍड. राजपूत यांनी स्पष्ट केले. 

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मृत्यूदरात सोलापूर शहर राज्यात अव्वल आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी 16 ते 26 जुलै या कालावधीत कडक लॉकडाउनचा निर्णय जारी केला. त्यामध्ये घरपोच दूध विक्री, एलपीजी गॅस सेवा यांना वेळ ठरवून परवानगी दिली. तर मेडिकल, हॉस्पिटल आणि शहर पोलिसांनी संचलित केलेले दोन पेट्रोल पंप 24 तास सुरु राहतील, असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. मागील लॉकडाउनच्या तुलनेत ही दहा दिवसांची संचारबंदी अधिक प्रभावी व्हावी यादृष्टीने महापालिकेने ठोस नियोजन केले आहे. शहरातून परवाना असलेल्या उद्योजकांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र असावे, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये व प्रतिबंधित क्षेत्रात या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 400 लॉकडाउन सहायक, पर्यवेक्षक, क्षेत्र अधिकारी व निरीक्षक प्रत्येकी 26 जणांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेसाठी पाच रिक्षाही तयार ठेवण्यात आल्या आहेत. 


'या' सेवा पूर्णपणे बंदच राहतील 

 • किरणा दुकाने, किरकोळ, ठोक व्रिक्रेते अन्‌ व्यापारी दुकाने 
 • क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उपहारगृहे, लॉज, हॉटेल, ऑर्केस्ट्रा बार, मॉल, बाजार समिती 
 • केश कर्तनालय, सलून, ब्यूटी पार्लर, आडत, आठवडा बाजार 
 • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी; मटन, चिकन, अंडी व मासे विक्री दुकाने 
 • मालवाहतूक, सार्वजनिक व खासगी वाहतूक, बांधकाम, खासगी कार्यालये 
 • चित्रपटगृहे, व्यायामशाहा, जलतरण तलाव, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे, मंगल कार्यालये, मॉल, लग्न समारंभ 
 • धार्मिक, राजकीय, सामाजिक, मनोरंजन कार्यक्रम; शासकीय स्वस्त धान्य दुकाने 
 • कृषी, बी-बियाणे, खते-किटकनाशके, चारा दुकाने वाहतूक बंद 


निर्बंधासह 'हे' सुरु राहणार 

 • घरपोच दूध विक्री, वर्तमान पत्र वितरण (सकाळी सहा ते नऊ) 
 • शहराबाहेरुन येणाऱ्या दूध विक्रेत्यांकडे संबंधित पोलिस ठाण्याचा पास बंधनकारक 
 • पाणी पुरवठा टॅंकर, सर्व बॅंका राहणार बंद; पशुधन, ओला चारा वाहतुकीस परवानगी, मात्र पास बंधनकारक 
 • एचडीएफसी, एक्‍सिक बॅंक, जनता बॅंक, विदर्भ कोकण कोकण बॅंक, जिल्हा बॅंकेच्या चेक क्‍लिअरिंग हाऊसेस सेवा सुरु राहणार 
 • पत्रकार, न्यायाधीश, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना बंधनकारक 
 • शहर पोलिसांचे संचिलत दोन पेट्रोल पंप 24 तास सुरु राहतील 
 • शहराबाहेर राहणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक 
 • शहराबाहेर शेती असलेल्यांना सकाळी नऊ वाजता जाता येईल तर सायंकाळी 5 पर्यंत परत येण्याची वेळ 
 • शहरातून उद्योगांकडे जाणाऱ्याकडे चारचाकी आवश्‍यक; एमआयडीसी व खासगी उद्योग चालू राहणार असलेल्यांना पास आवश्‍यक 


बंदोबस्तासाठी चार हजार पोलिस कर्मचारी 
सोलापूर शहरातील तीनशेहून अधिक प्रतिबंधित क्षेत्रात, रस्त्यांवर, नाकाबंदी पॉईंटवर, विविध चौकात, गल्लीबोळात वॉच ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. तसेच महापालिकेने नेमलेले समन्वयक, लॉकडाउन सहायक, पर्यवेक्षक, क्षेत्र अधिकारी, निरीक्षकांच्या मदतीलाही पोलिस कर्मचारी असतील. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या हेतूने संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने सुमारे चार हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलिस मित्र शहरातील विविध भागात तैनात असतील, असे पोलिस आयुक्‍तांनी स्पष्ट केले. शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ही संचारबंदी नागरिकांसाठीच असून कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोलापुकरांना सहकार्याचेही त्यांनी आवाहन केले.