Nawab Malik: नवाब मलिकांना दिलासा...न्यायालयाने दिला निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

Nawab Malik: नवाब मलिकांना दिलासा...न्यायालयाने दिला निर्णय

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पाडली. जामिनावर निर्णय देण्यास न्यायमूर्तींनी थेट नकार दिला आहे. (Order on Nawab Malik in PMLA case deferred till November 30)

मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्ट निर्णय देणार होते. मात्र अद्याप निकालाचं कामकाज पुर्ण न झाल्यानं निर्णय द्यायला कोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वकिलांना कोर्टमध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मलिक यांना चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्या. राहुल रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मलिक यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

टॅग्स :Supreme Courtnawab malik