पालकत्व हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण,'मेस्टा'चा पुढाकार

निराधार बालकांच्या शिक्षणासाठी मेस्टाने पुढाकार घेतला आहे.
निराधार बालकांच्या शिक्षणासाठी मेस्टाने पुढाकार घेतला आहे.
Summary

राज्यात असेही मुले आहेत ज्यांचे कोरोनामुळे आई आणि बाबा या दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या भावविश्‍वातील आई-बाबांची पोकळी कायम राहणार आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे Corona वर्षभरात दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात तब्बल दीडशेच्यावर बालके पोरकी Orphaned Children झाली आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या अशा बालकांना मोफत शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) Maharashtra English School Trustee Association या संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी ‘मेस्टा’शी संलग्न शाळा आहेत, तेथे या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबातील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. संसर्ग होऊन कोणाचे बाबा; तर कोणाची आई हिरावली आहे. मात्र, राज्यात Maharashtra असेही मुले आहेत ज्यांचे कोरोनामुळे आई आणि बाबा या दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या भावविश्‍वातील आई-बाबांची पोकळी कायम राहणार आहे. अशा मुलांसाठी शासनाकडून चांगल्या विविध योजना आखल्या जात आहेत. शासनाकडून मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या बॅंक खात्यात रक्कमदेखील जमा करण्यात येणार आहे. मात्र, छत्र हरपलेल्या या मुलांच्या आई-बाबाचे स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. या निराधार मुलांना एकट्याला आयुष्याचा संघर्ष करावा लागणार आहे. बालवयात सर्वांत मोठी अडचण असते. ती चांगल्या शिक्षणाची. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मुलांच्या शाळेचा खर्च कोणी व कसा करायचा? असे अनेक प्रश्‍न नातेवाइकांसमोर असतात. या प्रश्‍नावर मात करण्यासाठी मेस्टा संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यभरात मेस्टाशी संलग्न एकूण १८ हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. पालकत्व गमावलेल्या या बालकांना मोफत शिक्षण देण्यासाठी मेस्टा संघटनेशी सलग्न असलेल्या शाळांमध्ये मुलांना माध्यमिकपर्यंत शिक्षण मोफत दिले जाणार आहे. Orphaned Children Will Get Free Education

निराधार बालकांच्या शिक्षणासाठी मेस्टाने पुढाकार घेतला आहे.
औरंगाबाद हे नवीन औद्योगिक शहर बनत आहे : अमिताभ कांत

गणवेश, पाठ्यपुस्तकांसाठी एनजीओची मदत

निराधार मुलांचा गणवेश, पाठ्यपुस्तके, मेस व जेवणाच्या खर्चासाठी एनजीओची मदत घेण्यात येणार आहे. अशा मुलांना या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आईवडिलांच्या मृत्युपत्राची आवश्‍यकता असेल. सामाजिक बांधिलकी म्हणून मेस्टाने हा निर्णय घेतला आहे. पालकत्व हरपलेली ही मुलं शाळाबाह्य किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये, यासाठी मेस्टाचा हा प्रयत्न आहे. राज्यभरात कुठेही प्रवेशासाठी पालकांनी ९५१८३७२७५९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com