
Maharashtra Politics: ‘जास्त बोलू नको, औकातीत राहा’ ठाकरे गटाचा खासदार अन् भाजप आमदार भिडले
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात आज चांगलीच जुंपली. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. 'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा' अशी शब्दात खासदार ओम राजे यांनी आमदार राणा यांना सुनावलं आहे. तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना उत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीक विमा संदर्भात बैठकीत त्यांनी गोंधळ घालायला सुरू केला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा संदर्भात बैठक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसान या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. यासंदर्भात आमदार जगजित सिंग राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना निरोप दिला. यामुळे काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. साधारण 11 वाजण्याची वेळ या ठरली होती. परंतु 1 वाजले तरी बैठक सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. दरम्यान या बैठकीत दोन्ही नेते हमरीतुमरीवर आल्याचं पाहायला मिळालं.