‘इतर मागासवर्ग’चे आता ‘बहुजन कल्याण विभाग’

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग आता ‘बहुजन कल्याण विभाग’ म्हणून ओळखला जाणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्स मान्यता 
देण्यात आली.

मुंबई - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग आता ‘बहुजन कल्याण विभाग’ म्हणून ओळखला जाणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्स मान्यता 
देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विभागातील सर्वच समाज बहुजन या व्याख्येत येतात. त्यामुळे मागास प्रवर्ग हा शिक्‍का पुसून आता बहुजन कल्याण असे नामकरण व्हावे असा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडला होता.  

या विभागाचे सध्याचे नाव खूप मोठे व विस्तृत स्वरूपाचे आहे.  या विभागाकडे सोपविण्यात आलेल्या योजना व विभागाने नव्याने सुरू केलेल्या योजना, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या विभागाकडे हस्तांतरित केलेल्या योजनांचे स्वरूप पाहता विभागाचे नाव संक्षिप्त असावे यावर मंत्रिमंडळात एकमत झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other backward classes now belong to the Bahujan Welfare Department