राज्यात आज ५० ओमिक्रॉन बाधित; 36 रुग्ण एकट्या पुण्यातले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron West Bengal Lockdown

रुग्णसंख्येचा उद्रेक! राज्यात आज ५० ओमिक्रॉन बाधित; 36 रुग्ण एकट्या पुण्यातले

मुंबई: आज राज्यात ११,८७७ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मतृयदूर २.११% एवढा आहे. आज २,०६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१२,६१० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२१% एवढे झाले आहे. आज दिवसभरात ५० ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३६ रुग्ण हे पुणे शहरातील आहेत.

हेही वाचा: पेगाससची तुमच्यावरही पाळत? तसं वाटत असल्यास कळवा: सुप्रीम कोर्टाची समिती

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९२,५९,६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,९९,८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १०९१ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनची काय आहे स्थिती?

आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत.

ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

  • पुणे मनपा - ३६

  • पिपरी चिचंवड मनपा - ८

  • पुणे ग्रामीण - २

  • सांगली - २

  • ठाणे -१

  • मुंबई - १

आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top