नागपूर - राज्यातील बारा अकृषी विद्यापीठातील २ हजार ५३४ प्राध्यापकांच्या पदांपैकी १ हजार ३६८ पदे रिक्त आहेत. त्याची टक्केवारी ४७ इतकी आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदे भरण्यासाठी २०१९ मध्ये मान्यता दिली..मात्र, सहा वर्षांपासून यातील एकही पद भरण्यात आले नाही. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबत अर्ज केल्यावर हे धक्कादायक सत्य समोर आले.राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र, गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाच्या गप्पा मारत असताना, बहुतांश विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे दिवास्वप्न ठरले आहे..त्यातूनच विद्यापीठांचा दर्जाही खालावत असल्याचे दिसून येते. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासह इतर विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक २११ मुंबई विद्यापीठामध्ये, १९१ रिक्त पदे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असून त्यापाठोपाठ १६० रिक्त पदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आहे..एसएनडीटी, मुंबई विद्यापीठामध्ये १२९, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात १२४ तर छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही संख्या १२८ इतकी आहे.विशेष म्हणजे, ७ ऑगस्ट २०१९ साली एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पद भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्यातील एकही पद भरण्यास विद्यापीठांना यश आले नाही..विद्यापीठाकडून काढलेली जाहिरात रद्दराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दीड वर्षांपूर्वी ९२ पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, त्या जाहिरातीमध्ये विद्यापीठाने ‘एलआयटीयू’ विद्यापीठातील विभागांच्या पदांचा समावेश केला होता. त्यामुळे काही दिवसांनी ती जाहिरात रद्द करण्यात आलेली होती..अशी आकडेवारीविद्यापीठ -मंजूर पदे - रिक्त पदे - मान्यता दिलेली पदेमुंबई विद्यापीठ - ३७८ - २११ - १३६एसएनडीटी - २५८- १२९-७८कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ - ४३-२१-१२राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - ३३९-१६०-९२गोंडवाना विद्यापीठ - ४३-२०-११.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ - ४६-१६-०७शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - २६२-१२४-७२सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - ४००-१९१-१११डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - २७२-१२८-७३कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - १११-२८ -०६स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ - १६७-५४-२१संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - १२१-३७-१३.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.