
अविनाश साबापुरे
यवतमाळ : देशात मान्यता नसतानाही तब्बल २२ हजार २९८ शाळा मागील १२ वर्षांपासून सुरू आहेत. विशेष म्हणजे या शाळांनी ‘यूडायस कोड’ही मिळविलेले आहेत. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या बाबीवर गंभीर आक्षेप नोंदविला असून महाराष्ट्रातील अशा २३२ शाळांमधील ३९ हजार ८१९ विद्यार्थ्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे.