

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वर्षभरात ६१ जणांना प्राण गमावावा लागला असून, तब्बल ४ हजार ५७५ पशुधन गमावले आहे. तसेच वन्य प्राण्यांनी ९४ हजार ५६ ठिकाणी शेतीचे नुकसान केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तरात गुरुवारी (ता. ६) दिली.