- अविनाश साबापुरे
यवतमाळ - एकीकडे कमी पटाच्या कारणावरून शाळांचे समायोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तब्बल आठ हजार २१३ गावांमध्ये अजूनही साधे प्राथमिक शिक्षण देणारी शाळा पोहोचलेली नाही. तेथील मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे, हा प्रश्न आहे. या शैक्षणिक दुरवस्थेवर खुद्द केंद्रीय शिक्षण सचिवांनी बोट ठेवले असून येत्या काळात ही स्थिती सुधारण्याची सूचना केली आहे.