

Padmashri Raghuveer Khedkar News
esakal
नारायणगाव: ''पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने आत्यानंद झाला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेला व तमाशाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असताना मागील 53 वर्ष केलेला संघर्ष, कष्टाला न्याय मिळाला आहे. तमाशा कलेवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचा, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचा मी आभारी आहे.. शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे.'' अशी भावना लोककलेच्या माध्यमातून रंगभूमीवर अवघ्या महाराष्ट्रात नाव गाजविणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कलाभूषण रघुवीर तुकाराम खेडकर (वय 65) यांनी दैनिक सकाळशी बोलताना व्यक्त केली.