Palghar ZP Elections Delayed Due to Reservation Complications
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Palghar ZP Election : पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर; वाढीव आरक्षणाच्या पेचामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली!
Reservation Issue : वाढीव आरक्षणामुळे पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक आयोगाने ती लांबणीवर टाकली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मोखाडा : राज्यातील 12. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 125. पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी. 5. फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. मात्र, आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्हा परीषदेची निवडणूक वाढीव आरक्षणामुळे लांबली आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील ईच्छुक ऊमेदवारांची धाकधुक वाढली आहे.

