विठुरायाची पंढरी अन्‌ स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट कोरोनामुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी
श्री विठ्ठलाची पंढरी आणि श्री स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट तालुक्‍यातून कोरोना हद्दपार

विठुरायाची पंढरी अन्‌ स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट कोरोनामुक्‍त

सोलापूर : जिल्ह्यातील अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विठुरायाची पंढरी (शहर), स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट आणि करमाळा, माढा, माळशिरस या शहरातील कोरोना हद्दपार झाला आहे. मंगळवेढा व बार्शीचा ग्रामीण भाग कोरोनामुक्‍त झाला आहे.

हेही वाचा: सोलापूर : रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक

कोरोनाचे संकट आता संपुष्टात येऊ लागले आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट सुरु झाली आहे, पण आपल्याकडे कोरोनाची पुन्हा लाट येईल, यासंदर्भात अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने काहीही स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांनी दिली. तरीही, नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूर शहर-जिल्हा कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णवाढ व मृत्यूदरात राज्याच्या टॉपटेन जिल्ह्याच्या यादीत राहिला. त्यावेळी स्मशानभूमीतदेखील वेटिंग पहायला मिळाले. पण, कोविशिल्ड व कोवॅक्‍सिन या प्रतिबंधित लसींमुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली आणि तिसऱ्या लाटेत तीव्र लक्षणे असलेले रुग्ण अत्यल्प राहिले. सोलापूर ग्रामीणमध्ये आतापर्यंत एक लाख 86 हजार 32 तर शहरात 33 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोना बाधित झाले. त्यापैकी पाच हजार 231 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आणि दोन लाख 20 हजारांवर रुग्ण कोरोनामुक्‍त झाले. सध्या शहरातील तीन तर ग्रामीणमधील 20 रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा: राज्यातील 22 लाख शेतकऱ्यांना वीजेची अंदाजे बिलं! दहा ते 50 हजार भरण्याची अट

कोरोनामुक्‍त तालुके व शहरे
- अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त
- करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर शहरात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही
- मंगळवेढा व बार्शी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून कोरोना झाला हद्दपार
- सोलापूर शहरात कोरोनाचे अवघे तीन सक्रिय रुग्ण; ग्रामीणमधील 20 रुग्ण घेताहेत उपचार

हेही वाचा: आमदार प्रणिती म्हणाल्या, योगी, महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे

अक्‍कलकोट, पंढरपूरची स्थिती
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत पंढरपूर तालुक्‍यातील 36 हजार 574 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील तब्बल 672 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकावेळी तालुक्‍यातील सर्वच रुग्णालयांमधील खाटा हाऊसफुल्ल झाल्याने त्यांना सोलापूर शहरातील रुग्णालयातून उपचार घ्यावे लागले. सध्या पंढरपूर शहर पूर्णपणे कोरोनामुक्‍त झाले असून पंढरपूर ग्रामीणमध्ये केवळ तीन रुग्ण आहेत. दुसरीकडे श्री स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट आता पूर्णपणे कोरोनामुक्‍त झाले आहे. तत्पूर्वी, या तालुक्‍यातील चार हजार 840 रुग्णांपैकी 211 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आता तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

Web Title: Pandhari Of Sri Vitthal And Deportation Of Corona From Akkalkot Taluka Of Sri Swami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top