esakal | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया; म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया; म्हणाल्या...

sakal_logo
By
सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. साकीनाका सारखी धक्कादायक घडल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास यश मिळू शकलेलं दिसत नाही. याच मुद्दावर आज पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. राज्यातील घटना मन सुन्न करणाऱ्या असल्याचे यावेळी पंकडा मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच करुणा शर्मा प्रकऱणावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांतील सर्व आरोपींनी कठोर शिक्षा व्हायला हवी, प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा भावना पंकता मुंडे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. करुणा शर्मा यांच्याबद्दल विचारले असता त्यांच्यावर बोलणे टाळले असले तरी, कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा: महिला पोलिसांची ड्युटी ८ तासांची; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चुकीचे ट्रेंड सुरु झाले आहेत. यामुळे सामान्य लोकांची राजकारणाकडे बघण्याची प्रतिक्रीया बदलली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. करुणा शर्मा यांच्याबद्दल विचारले असता त्यांच्यावर बोलणे टाळले असले तरी, कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी प्रतिक्रीया दिली आहे. आताचं राजकारणाला आपण सभ्य म्हणू शकत नाही, राजकारणावर अतिशय वाईट वेळ आली असून, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण अजूनच खराब झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पंकजा मुंडे याप्रकरणी यापुर्वी देखील परळीत घडलेला प्रकार मन सुन्न करणारा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चुकीचे ट्रेंड सुरु झाले आहेत. यामुळे सामान्य लोकांची राजकारणाकडे बघण्याची प्रतिक्रीया बदलली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top