खडसे पुढील मंत्रिमंडळात असावेत : पंकजा मुंडे

वृत्तसंस्था
रविवार, 22 सप्टेंबर 2019

एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा देते, खडसे मंत्रिमंडळात असावेत. नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या भूमिकेत मी नाही.

मुंबई : एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या भूमिकेत मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावे. पुढील मंत्रिमंडळात ते मंत्रिमंडळात असावे, असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी झालेले नाहीत. आता त्यांना पुढील सरकारमध्ये मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत मुंडे यांनी म्हटले आहे. 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंडे म्हणाल्या, की एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा देते, खडसे मंत्रिमंडळात असावेत. नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या भूमिकेत मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde wants Eknath Khadse include in next cabinet