Pankaja Munde : पंकजा मुंडेंना डावलण्याचं नेमकं कारण काय? भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना डावलण्याचं नेमकं कारण काय? भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपकडून डावलण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या 'मिशन १४४'ची सुरुवात होत आहे. जे.पी. नड्डा उद्या ११ वाजता चार्टर्ड विमानाने चंद्रपूरमध्ये येत आहेत.

चंद्रपूरमध्ये नड्डा यांची न्यू इंग्लिश ग्राऊंडवर जाहीर सभा होईल. त्यानंतर ते भाजपच्या 'लोकसभा टीम'शी बैठकीतून संवाद साधणार आहे. पुढे ते औरंगाबादला जातील. राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नड्डा यांच्यासोबत असलीत.

हेही वाचा: Delhi crime : नराधमांनी फरफटत नेलेली तरुणी घरात एकटीच कमावणारी होती

औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांना डावलण्याचं काम करत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

याशिवाय मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची पक्षांतर्गत घुसमट लपून राहिलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर मुंबईत पंकजांनी राज्यातल्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे आसूड ओढला होता. तरीही भाजपमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं नाही.