
धनंजय मुंडेंवर ब्रीच कँडीमध्ये उपचार, पंकजांसह प्रितम मुंडे भेटीसाठी हजर
मुंबई : धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँड रुग्णालयात उपचार (Dhananjay Munde Health) सुरू आहेत. आज अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर भावाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja) आणि खासदार प्रितम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या आहेत.
हेही वाचा: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
धनंजय मुंडेंना मंगळवारी सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते. तिथेच सायंकाळच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती आहे. सध्या धनंजय मुंडेंवर उपचार सुरू आहेत. काल रात्री राजेश टोपे स्वतः रुग्णालयात हजर होते. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली असून धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.
या नेत्यांनी घेतली भेट -
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज सकाळीच धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. धनंजय मुंडेंना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवायला सांगितलं आहे. आज दुपारी त्यांना विशेष खोलीत हलविण्यात येणार आहे. आज काही चाचण्या करण्यात येणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच मुंडेंचा मराठवाड्यात दौरा होता. त्यामुळे ते खपू थकले होते. थकव्यामुळे त्यांना चक्कर आली होती. सध्या काळजी करण्याचं काहीही कारण नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यानंतर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुंडेंची भेट घेतली.
Web Title: Pankaja Pritam Munde Enquiry About Dhananjay Munde Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..